एमएचटी-सीईटीचा निकाल १० जून रोजी

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीच्या निकालांची संभाव्य तारखा राज्य सीईटी सेलने जाहीर केली आहे. त्यानुसार एमएचटी-सीईटी या परीक्षेचा निकाल १० जून रोजी जाहीर होणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचा संभाव्य तारखा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठी असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल १० जून रोजी जाहीर होईल. तर बीए आणि बीएस्सी-बीएड या सीईटीचा निकाल १२ जून, पदवीच्या हाॅटेल मॅनेजमेंटच्या सीईटीचा निकाल ११ जून, पदव्युत्तरच्या हाॅटेल मॅनेजमेंटचा निकाल १३ जूनला जाहीर होईल.
तसेच, नर्सिंग आणि पाच वर्षीय एलएलबीच्या सीईटीचा निकाल १६ जून रोजी, तर बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटीचा निकाल १७ जून रोजी जाहीर होणार असल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. तसेच या सर्व सीईटीलचा निकाल सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





