मुंबई : मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हक्काचे घर घेण्याचे सर्वसामन्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) तब्बल १९ हजार ४९७ घरांचे बांधकाम केले जाणार आहे. नुकताच म्हाडाचा सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, या बांधकांमासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध म्हाडाकडून नुकताच सादर करण्यात आलेल्या सन २०२५ २०२६ च्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांत म्हाडाकडून घरांचे बांधकाम केले जाणार आहे. परिणामी म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. येथे बांधली जाणार घरे कोकण मंडळाअंतर्गत ९९०२ घरे बांधली जातील. त्यासाठी १४०८.८५ कोटी, पुणे मंडळाअंतर्गत १८३६ घरे बांधली जाणार असून त्यासाठी ५८५.९७कोटींची तरतूद आहे. तर नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ घटे बांधली जाणार असून त्यासाठी १००९.३३ कोटी आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ घरे बांधली जाणार असून यासाठी २३१.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, याशिवाय नाशिक मंडळाअंतर्गत ९१ घरे बांधली जाणार असून त्यासाठी ८६ कोटींची तरतूद केली गेली आहे. तर अमरावती मंडळाअंतर्गत १६९ घरे बांधली जाणार असून, ६५.९६ कोटी तरतूद आहे.