Shivsena MLA Disqualification Result | विधानसभा अध्यक्ष नार्वेकर अद्याप अँटी चेम्बरमध्येच…

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दीड वर्षापूर्वी दोन गटात विभागलेल्या शिवसेनेत सुरू झालेली कायदेशीर लढाई आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला अवघी काही मिनिटे बाकी आहेत. या निकालाकडे फक्त राज्याचंच नाहीतर देशांचं लक्ष लागलेलं आहे. दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी 4 वाजता विधानभवनात सेंट्रल हॉलमध्ये अध्यक्ष करणार निकालाच वाचन करणार होते. मात्र अद्याप वाचन सुरू झालेलं नाही.
अपात्र निकालावरचं निकालपत्र तयार असून आता वाचन कधी सुरू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अद्याप अँटी चेम्बरमध्येच आहेत. तसेच दोन अधिकाऱ्यांसह सचिव नार्वेकरांच्या दालनात दाखल झाले आहेत.
आमदार अपात्रता निकालापूर्वी हालचालींना वेग ! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली फडणवीसांची भेट
विधानभवानाच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार आणि वकील दाखल झाले आहेत. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे.





