Meta New Rule: रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Metaचा महत्त्वाचा निर्णय
Meta New Rule : किशोरवयीन मुलांना दिवसातून केवळ दोन तास हे प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी

Meta New Rule : अमेरिकेत किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठा खटला संपवण्यासाठी ‘मेटा’ कंपनीने तडजोड स्वीकारली आहे. या प्रकरणाच्या निकालात मेटा सुमारे १७ अब्ज डॉलर भरपाई देणार असून, मुलांसाठी आपल्या अॅप्समध्ये अनेक मोठे बदल करणार आहे.
त्यानुसार आता अमेरिकेत १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वापरासाठी नवे आणि कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
नव्या नियमांनुसार, १८ वर्षांखालील वापरकर्त्यांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता येणार नाही. याशिवाय, किशोरवयीन मुलांना दिवसातून केवळ दोन तास हे प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी असेल. शालेय दिवसांमध्येही त्यांच्या सोशल मीडिया वापराला निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे मुलांमधील स्क्रीन टाईम कमी होण्यास आणि रात्रीच्या वेळेत होणारा सोशल मीडियाचा वापर रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…





