Aadi Foundation : ‘आदी फाउंडेशन’च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !
आदी फाउंडेशनतर्फे मागील वर्षापासून इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे.

Aadi Foundation – आदिनाथनगरच्या आदी फाउंडेशनच्या वतीने शेवगाव तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून विविध उच्चपदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा तसेच केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झालेल्या नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा येथील शुभम मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आज सोमवारी संपन्न झाला.
यावेळी राजळे, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, तहसीलदार आकाश दहाडदे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव,शिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजळे म्हणाल्या , स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांनी मानवसेवेचा ध्यास घेत आदी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी व लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी देशी वृक्षबियांचे संकलन व संवर्धन, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी भव्य पुस्तक प्रदर्शन, हास्य कवी संमेलन, संगीत मैफिली, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यांसारखे अनेक विधायक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले.
त्यांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याच्या उद्देशाने आदी फाउंडेशनतर्फे मागील वर्षापासून इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि समाजात गुणवत्तेला योग्य प्रतिष्ठा प्राप्त होते.
भाजपा तालुकाध्यक्ष महेश फलके यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू तसेच तहसीलदार आकाश दहाडदे यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि प्रशासकीय सेवांमधील संधी याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, नगरसेविका आशा बुलबुले, सविता फडके, डॉ. गीता लांडे, नगरसेवक गणेश कोरडे, सागर फडके, विनोद मोहिते, कमलेश गांधी, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्याताई आधाट, शहराध्यक्ष दिपाली काथवटे, उमेश भालसिंग, भीमराज सागडे, कैलास सोनवणे, अजय भारस्कर, राहुल सावंत, अशोकराव खिळे, नारायण मडके, कासम शेख, अशोकराव ससाने, अशोकराव तानवडे,
वाय. डी. कोल्हे, गंगाभाऊ खेडकर, केशव आंधळे, संजय खेडकर, सुनीलसिंग राजपूत, राजेंद्र डमाळे, सुरेश नेमाने, सुधीर जायभाय, अनिल सुपेकर, चंद्रशेखर मुरदरे, सोमनाथ कळमकर, बाबासाहेब गोरडे, अनंता उकिरडे, ज्ञानेश्वर खांबट, लहू भवार, सचिन म्हस्के, सुभाषराव बडदे, महादेव पवार, सुभाषराव बरबडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





