Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’तील मोठी अपडेट समोर! तब्बल 92 लाख महिलांचा हप्ता बंद
Ladki Bahin Yojana : केवळ बीड मधूनच तब्बल 28 लाख महिला योजनेसाठी अपात्र

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतची एक अपडेट समोर आली आहे. या योजनेतून आणखी काही महिलांची नावे वगळण्यात आली आहे. सुरुवातीला 80 लाख महिलांची नावं कमी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता 92 लाख बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. यात बीड मधून तब्बल 28 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे. परंतु ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली, त्यांच्या तक्रारींची दखल घेत चौकशी केली जाईल, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
अपात्र ठरवण्यामागचे कारण काय?
ज्या महिला ई – केव्हायसी पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. तर योजनेसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा निकष लाभार्थी महिलांनी पाळलं नसल्याचं देखील समोर आले. तसेच तब्बल 12 लाख महिलांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं.
तर 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय हे 65 वर्षांपूढे असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. यादीत तब्बल 14 हजार पुरुषांची नावे असल्याची माहिती समोर येत असून छाननीत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. Ladki Bahin Yojana
‘कॅग’ने ओढले ताशेरे
‘कॅग’ने प्रसिद्ध केलेल्याअहवालानुसार, लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण येऊ शकतो. योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या 3,542 कोटी रुपयांच्या खर्चाचे कोणतेही ठोस समर्थन करता येणार नाही, असे ‘कॅग’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
महिला कल्याणासाठी राज्याचा होणारा खर्च 2023-24 मध्ये केवळ 261.78 कोटी रुपये होता. मात्र, 28 जून 2024 रोजी ‘लाडकी बहीण योजने’ला मंजुरी मिळाल्यानंतर, 2024-25 मध्ये हा खर्च थेट 33,514.36 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. Ladki Bahin Yojana
हेही वाचा:
Thailand Bangkok Fire: थायलंडमधे पबच्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू ; ६० जण गंभीर जखमी






