Border 2 poster : मेरी जान हिंदुस्थान…! स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बॅार्डर 2 ची रिलीज डेट जाहीर

Border 2 poster : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सनी देओल याच्या बहुचर्चित बॅार्डर २ सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चाहत्यांना हा सिनेमा कधी भेटीला येणार याची उत्सुकता लागली होती. अखेर आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बॅार्डर २ सिनेमाचं जबरदस्त पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, हा सिनेमा कधी रिलीज होणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
या पोस्टरमध्ये अभिनेता सनी देओल फौजीच्या गणवेशात दिसत असून, त्याच्या खांद्यावर तोफ घेऊन ठाम आणि जोशपूर्ण नजरेने उभा आहे. पोस्टरच्या पार्श्वभूमीला तिरंगा आणि रंणांगणाचं वातावरण दिसत आहे. या पोस्टरला चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत.
View this post on Instagram
हा सिनेमा बॅार्डरचा सिक्वल आहे. १९९७ साली बॅार्डर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचा विषय हा देशभक्तीपर असल्याने त्यावेळी सिनेमाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. बॅार्डर २ हा सिनेमा २२ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रिलीज होणार आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हे पोस्टर जाहीर करणं हा एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहे, कारण हा दिवस देशासाठी लढलेल्या वीरांची आठवण करून देतो, असं या सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी म्हटलं आहे. या सिनेमात अभिनेता सनी देओल याच्याशिवाय दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मेधा राणा, मोना सिंग, सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा : Chhagan Bhujbal : ‘आंदोलन कुठेही कर, पण नियमात कर!’ मनोज जरांगेंच्या आंदोलनाला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर





