महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार; ‘या’ शहरांना दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा!
Updated On:

मुंबई – उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं आपला अंदाज व्यक्त केला असून, आज (दि. १७) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा उष्णतेचा पारा अधिक असणारा आहे. काल (दि. १६) विदर्भात उष्णतेचा पारा ४० अंशांपार गेला होता.
तर, दुसरीकडे मुंबईतील काही ठिकाणच्या स्टेशनवरील तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेलं होतं. मुंबईमध्ये १९५६ नंतर प्रथमच पारा ४१ अंशांवर गेला होता. मात्र, आता मुंबईतील उष्णतेची लाट ओसरली असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.





