Javelin Throw : कोण आहेत ‘नीरज चोप्रा’चे नवे प्रशिक्षक? ज्यांच्या नावावर आहेत 3 जागतिक विजेतेपद…

Neeraj Chopra New Coach Jan Zelezny : ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने एक मोठी बातमी शेअर केली आहे. क्लॉस बारटोनिट्झ यांच्या निवृत्तीनंतर नीरज चोप्राच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. जॉन झेलेझनी (Jan Zelezny) नीरज चोप्राचे नवे प्रशिक्षक बनले आहेत. त्यांच्या नावावर अनेक ऑलिम्पिक सुवर्णपदके आणि जागतिक विजेतेपद तसेच अनेक विक्रमांची नोंद आहे. ते नीरजचे पूर्वीचे प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिएझ यांची जागा घेतील, ज्यांच्यासोबत नीरजने दोन ऑलिम्पिक आणि दोन जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.
झेलेजानीचे प्रशिक्षक बनल्याने नीरज आनंदी….
नीरज चोप्रा याने आता तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि सध्याचा विश्वविक्रम धारक जॉन झेलेझनी यांना त्याच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत झेलेझनी यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या पगाराचा खर्चही मंत्रालय उचलणार आहे.
From being Neeraj’s Idol to becoming coach ✨
Neeraj Chopra 🤝 Jan Železný
A start of a new exciting partnership and hope for a lot of medals for India in the future 🇮🇳❤️ pic.twitter.com/qouAYbhrvP
— The Khel India (@TheKhelIndia) November 9, 2024
या नव्या प्रवासाबद्दल उत्साह व्यक्त करताना नीरज चोप्रा म्हणाला की, “माझ्या लहानपणापासून, मी झेलझनीच्या तंत्राचा आणि अचूकतेचा खूप मोठा चाहता आहे. त्याचे व्हिडिओ पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळायची. आता त्याच्यासोबत काम करण्याची संधी माझ्या कारकिर्दीला नवीन आयाम देईल. आमच्या भाला फेकण्याच्या शैलीही खूप सारख्या आहेत, ज्याचा फायदा मला प्रशिक्षणादरम्यान होईल.”
झेलेजानीचा विक्रम अजूनही अबाधित….
साल 1992, 1996 आणि 2000 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकच्या जगातील एक नाव म्हणजे जान झेलेझनी. 1996 मध्ये 98.48 मीटर भाला फेकून त्यांनी तयार केलेला विक्रम आजतागायत मोडता आलेला नाही. झेलेझनीकडे 1993, 1995 आणि 2001 चे जागतिक विजेतेपद देखील आहे. त्याच्या रेकॉर्डमध्ये जगातील टॉप 10 पैकी पाच सर्वात लांब भाला फेकण्याचा समावेश आहे. झेलेझनीने झेक प्रजासत्ताकच्या काही सर्वोत्तम खेळाडू जसे की जेकब वडलेज, विटेझस्लाव्ह वेसेली आणि तीन वेळा विश्वविजेती बार्बोरा स्पोटाकोवा यांनाही प्रशिक्षण दिले आहे.





