रायबरेली – भारताच्या महिला हॉकी संघाची स्टार खेळाडू राणी रामपाल हिचा एका खास गोष्टीद्वारे सन्मान करण्यात आला आहे. रायबरेलीतील हॉकी स्टेडियमला राणी रामपालचे नाव दिले देले आहे. पूर्वी हे स्टेडियम एमसीएफ रायबरेली टर्फ या नावाने ओळखले जात होते आता त्याची ओळख राणी रामपाल गर्ल्स हॉकी टर्फ असे ओळखले जाणार आहे.
देशाकडून हॉकी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, आपले नाव एखाद्या मैदानाला दिले जाइल असे कधीही स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, आता माझ्या नावाचे स्टेडियम असल्यामुळे आनंद तर झालाच आहे; परंतु आता माझ्यावरची जबाबदारीही वाढली आहे.
येत्या काळात देशाला विविध स्पर्धांमध्ये चमकदार यश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, अशा शब्दात राणीने आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाकडून तब्बल 250 आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळलेली राणी रामपाल आपल्याच नावाचे स्टेडियम असलेली पहिलीच महिला हॉकीपटू ठरली आहे.