Mayor Manjusha Nagpure: कामातील अनुभव खुलेपणाने मांडावा – महापौर मंजुषा नागपुरे
Mayor Manjusha Nagpure:

तिसऱ्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ
Mayor Manjusha Nagpure: प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नियम व व्यवहारिकतेचा समन्वय साधून काम केल्यास कोणताही प्रकल्प यशस्वी होतो. अधिकाऱ्यांनी कामातील अनुभव आणि त्यातील विनोदी प्रसंग पुस्तके, परिसंवादांतून खुलेपणाने मांडावेत, अशी अपेक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी शनिवारी (दि. २८) व्यक्त केली.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, पुणे महापालिका, यशदा आणि संवाद पुणे यांच्यातर्फे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.
दोन दिवसीय संमेलनाला उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या संकेतस्थळाचे आणि साहित्यरंग या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवांवर आधारित साहित्यनिर्मिती करावी, असे आवाहन केले. पुणेकरांच्या भाऊ, फ्लेक्स काढा ना या वाक्यातूनही महापालिका कर्मचाऱ्यांमधील साहित्यिक अंग दिसते, या त्यांच्या निरीक्षणाला उपस्थितांनी दाद दिली.
संमेलनात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चित्र, छायाचित्रे व पुस्तकांचे प्रदर्शनदेखील भरवले आहे. तसेच बारा विभागांतील ३२ अधिकारी कर्मचाऱ्यांना ग्रंथपुरस्कार दिले जाणार आहेत.





