मोठी बातमी ! महायुतीची आजची बैठक अचानक रद्द ; काळजीवाहू मुख्यमंत्री मूळ गावी जाणार

Mayauti Meeting Cancle । राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जवळपास निर्णय झाले आहेत . याविषयी चर्चा करण्यासाठी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. केवळ ओपचारिकता बाकी असल्याचे म्हटले जात आहे.
महायुतीची बैठकअ चानकपणे रद्द Mayauti Meeting Cancle ।
काल रात्री दिल्लीत बैठक झाल्यानांत आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
काळजीवाहू मुख्यमनातरी एकनाथ शिंदे गावी जाणार Mayauti Meeting Cancle ।
महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्याचबरोबर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.





