MI vs LSG : दोन षटकार बसल्यानंतर मयंक यादवने सुधारली चूक, हिटमॅनला ‘असा’ दाखवला तंबूचा रस्ता

MI vs LSG Mayank Yadav dismisses Rohit Sharma : आयपीएल २०२५ मधील ४५व्या सामन्यात वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेl. मुंबईचा सलामीवीर रोहित शर्माचा आवडता शॉट संपूर्ण जगाला माहिती आहे. कोणताही गोलंदाज चुकूनही रोहितला बाऊन्सर चेंडू टाकत नाही. कारण त्या चेंडूवर रोहित पूल किंवा हूक शॉट नक्कीच मारतो आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. मात्र, लखनौ सपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने नेमकी हीच चूक केली.
मयंक यादवने तिच चूक केली –
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडत आहेत. दुखापतीनंतर मयंक यादव पुनरागमन करत आहे. गेल्या हंगामात त्याने त्याच्या वेगाने फलंदाजांना खूप त्रास दिला होता. आजच्या सामन्यात मयंकने रोहितविरुद्धही असाच प्रयत्न केला. पण त्याच्या चेंडूचा परिणाम इतर गोलंदाजांसारखाच झाला. रोहितने तिसऱ्या षटकातील पहिला आणि दुसरा चेंडू सहज षटकारांसाठी खेचला.
Rohit Sharma against Mayank Yadav..!!
– 6,6,0,0,W
After back to back sixes from Rohit Sharma, Mayank gets him in the same over.#LSGvMI #MIvLSG pic.twitter.com/HHUg4T8iJo
— Kashif (@cricstate) April 27, 2025
रोहित शर्मा अडकला जाळ्यात –
🔥 Mayank Yadav strikes gold! 🔥
Sends Rohit Sharma back early pic.twitter.com/O4c6o7lA5u
— Rio (@CricRio6) April 27, 2025
मयंक यादवला लगेच समजले की रोहित शर्माला पिच केलेल्या चेंडूने त्रास देता येणार नाही. त्याने ऑफ स्टंपची लाईन पकडली. रोहितने सलग दोन डॉट बॉल खेळले. त्यानंतर मयंकने ऑफ स्टंपच्या बाहेर एक संथ चेंडू टाकला. जो रोहितने थर्ड मॅनच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडूला गती नव्हती आणि त्यामुळे तो शॉर्ट थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रिन्स यादवच्या हातात गेला. ज्यामुळे तो झेलबाद झाला.
हेही वाचा – Cheerleaders Salary : चीअरलीडर्सना प्रति सामना किती मानधन मिळते? IPLचा कोणता संघ देतो सर्वाधिक सॅलरी?
रोहितने केल्या फक्त १२ धावा –
पहिल्या दोन षटकांत रोहित शर्माला स्ट्राईक मिळाला नाही. तो ५ चेंडूत १२ धावा काढून बाद झाला. याआधी, त्याची बॅट सलग दोन सामन्यांमध्ये यशस्वी ठरली होती. त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अर्धशतकं झळकावले होते. २०१६ नंतर, रोहितने प्रथमच आयपीएलमध्ये दोन सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतके झळकावली. पण लखनौविरुद्ध चांगली सुरुवात केल्यानंतर तो बाद झाला.





