Pune : माउलींचे मानाचे अश्व रंगारी गणपतीच्या दर्शनाला

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे बुधवारी दर्शन घेतले. या वेळी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.
अंकली (कर्नाटक) येथील श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व अंकलीतून येऊन दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत सहभागी होतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात या दोन अश्वांना मानाचे स्थान असते.
अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची मानाची परंपरा आहे.
मंगळवारी या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.





