Pune District : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवणार – मंत्री भरणे

इंदापूर : राज्यांतील अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी, प्रयत्न करणार असून, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मुंबई येथील मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन बुधवार (दि. 8) राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी मंत्री भरणे बोलत होते. यावेळी राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात.
या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबवावेत अशा सूचना संबधीत अधिकार्यांना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असेही आदेश मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.





