Matthew Breetzke : दक्षिण आफ्रिकेच्या युवा खेळाडूचा ऐतिहासिक पराक्रम! ५४ वर्षांच्या वनडे इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं

सलग चार वनडेंमध्ये झळकावले अर्धशतक –
मॅथ्यू ब्रीट्झकेने सलग चार वनडे सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळी करत एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या पहिल्या चार वनडे सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. यापूर्वी भारताच्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी 1987 च्या विश्वचषकात सलग चार अर्धशतके झळकावली होती, परंतु त्यांना ही कामगिरी पाच सामन्यांमध्ये करता आली होती, कारण एका सामन्यात त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
मॅथ्यू ब्रीट्झकेचा शानदार प्रवास –
Matthew Breetzke : South Africa’s Rising ODI Star! ⚡️
Consistent, powerful, and hungry#cricket #SAvsAUS #matthewbreetzke #SouthAfrica pic.twitter.com/0enUrjbDyM
— CricInformer (@CricInformer) August 22, 2025
मॅथ्यू ब्रीट्झकेने दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पणापासूनच अप्रतिम फॉर्म दाखवला आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध लाहोर येथे 148 चेंडूंमध्ये 150 धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर कराची येथे पाकिस्तानविरुद्धच त्याने 84 चेंडूंमध्ये 83 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत केर्न्स येथे त्याने 56 चेंडूंमध्ये 57 धावा फटकावल्या, तर दुसऱ्या वनडेत मॅके येथे 78 चेंडूंमध्ये 88 धावा केल्या. या चार सामन्यांमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने पहिल्या तीन वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा विक्रमही नोंदवला आहे.
हेही वाचा – आशिया कप निवडीनंतर BCCI चा मोठा निर्णय, नवीन निवड समिती सदस्यांसाठी मागवले अर्ज
मॅथ्यू ब्रीट्झकेच्या पहिल्या चार वनडेंमधील धावा:
- 150 (148) वि. पाकिस्तान, लाहोर
- 83 (84) वि. पाकिस्तान, कराची
- 57 (56) वि. ऑस्ट्रेलिया, केर्न्स
- 88 (78) वि. ऑस्ट्रेलिया, मॅके
मॅथ्यू ब्रीट्झकेच्या या ऐतिहासिक कामगिरीने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उगवता तारा ठरत आहे.





