आशिया कप निवडीनंतर BCCI चा मोठा निर्णय, नवीन निवड समिती सदस्यांसाठी मागवले अर्ज

वरिष्ठ पुरुष निवड समितीतील दोन जागा रिक्त –
वरिष्ठ पुरुष निवड समितीतील दोन जागा रिक्त असून, या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कसोटी, एकदिवसीय, टी-२० आणि बीसीसीआयद्वारे ठरवण्यात येणाऱ्या अन्य कोणत्याही स्वरूपातील भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या (वरिष्ठ) निवडीची जबाबदारी पार पाडावी लागेल. यासाठी बीसीसीआयने पात्रता निकषही निश्चित केले आहेत.
🚨 BCCI ANNOUNCEMENT 🚨
The Board of Control for Cricket in India is inviting applications for National Selectors (Men’s Team – 2 positions)👉 Responsibility: Pick Team India across all formats (Tests, ODIs, T20Is).
👉 Eligibility:
✔️ 7+ Tests OR 30+ First-Class matches OR 10… pic.twitter.com/HOmfGq4tHl— Crikistaan (@crikistaan) August 22, 2025
पात्रता निकष:
- किमान ७ कसोटी सामने; किंवा ३० प्रथम श्रेणी सामने; किंवा १० एकदिवसीय आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.
- खेळातून किमान ५ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेली असावी.
- बीसीसीआयच्या कोणत्याही क्रिकेट समितीचे एकूण ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सदस्य नसावे.
नुकतीच झाली आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड –
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, निवड समितीच्या सदस्यांचा करार दरवर्षी नूतनीकरण केला जातो. कोणत्या निवड समिती सदस्यांना बदलायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. सध्या वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित अगरकर असून, त्यात एस. एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरथ यांचा समावेश आहे. या समितीने नुकतेच आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड केली होती.
हेही वाचा – Run Out Video : शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी हवी होती एक धाव, अन् फलंदाज धावताना पडला, पाहा VIDEO
ज्युनियर निवड समितीतही एक जागा रिक्त –
याशिवाय, बीसीसीआयने पुरुष ज्युनियर क्रिकेट निवड समितीतील एक रिक्त जागा भरण्यासाठीही अर्ज मागवले आहेत. ही समिती शिबिरे, दौरे आणि स्पर्धांसाठी २२ वर्षांखालील वयोगटातील संघांच्या निवडीची जबाबदारी सांभाळते.





