Massive Fire Delhi: दिल्लीतील भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू ; मदत आणि बचावकार्य सुरु
Massive Fire Delhi: देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आलीय. पालममधील एका इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Massive Fire Delhi: देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आलीय. पालममधील एका इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आगीची घटना माहिती झाल्यानंतर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. माहिती मिळताच, सुमारे ३० अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आणखी लोक जखमी होण्याची भीती आहे.
दिल्लीतील पालमच्या साध नगरमधील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिले की, पालममधील एका बहुमजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीबद्दल ऐकून त्यांना खूप दुःख झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आणि काही जण अजूनही आत अडकले आहेत.
बचावकार्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, जिल्हा प्रशासन, दिल्ली अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस बचावकार्याचे नेतृत्व करत आहेत. या घटनेच्या तपासासाठी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना!
बचाव आणि मदतकार्य तीव्र Massive Fire Delhi:
प्रशासनाने बचावकार्य तीव्र केले आहे. दिल्ली अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांनी सूत्रे हाती घेतली आहेत. प्रशासनाने बचावकार्य अधिक तीव्र केले आहे. इमारतीत कोणी अडकले नाही याची खात्री करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे.






