Nepal floods and landslides : नेपाळमध्ये पूर, भूस्खलनात ५९ जणांचा मृत्यू
Updated On:

काठमांडू – नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामध्ये किमान ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारपासून नेपाळचा बहुतेक भूभाग पाण्याखाली गेला आहे.
पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये मरण पावणाऱ्या ५९ जणांपैकी ३७ जण काठमांडू खोऱ्यामध्ये मरण पावले आहेत. पूराशी संबंधित घटनांमध्ये ३४ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अजूनही ४० जण बेपत्ता आहेत. तर एक हजारापेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आले आहे. देशभरातील ४४ महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहेत.
पुरामुळे काठमांडू शहराचा वीजपुरवठा दिवसभरापासून खंडीत झाला आहे. काठमांडू शहरातील २२६ घरे पाण्याखाली गेली असून ३ हजार जणांचे बचाव पथक नेपाळ पोलिसांबरोबर मदत कार्यासाठी तैनात केले गेले आहेत.





