Accident News : डंपरची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; चार जणांचा मृत्यू

Accident News – राजस्थानच्या पाली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या एका अपघातात एका डंपरने रुग्णवाहिकेला धडक दिली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
रोहत पोलीस स्टेशनचे अधिकारी निरंजन सिंह यांनी सांगितले की, अशोक नावाच्या एका रूग्णाला अहमदाबादहून जोधपूरला रुग्णवाहिकेतून आणले जात होते.
त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. गजानगढजवळ अचानक गुरे रस्त्यावर आली आणि रुग्णवाहिकेला धडकली. अपघातात रुग्णवाहिकेचे नुकसान झाले. जोधपूरहून दुसरी रुग्णवाहिका मागवण्यात आली.
रुग्णाला दुसऱ्या रुग्णवाहिकेत हलवले जात असताना एका वेगवान डंपरने (अपघातग्रस्त) रुग्णवाहिकेला धडक दिली, त्यामुळे मोहिनी देवी आणि फगली देवी यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांनी सांगितले की, हरिराम आणि सुनील या अन्य दोघांचा जोधपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील हा रुग्णवाहिकेचा चालक होता. या अपघातात अशोक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.





