धारावीमध्ये सिलेंडरच्या गाडीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Dharavi Fire | मुंबईच्या धारावीमधील पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागली. ट्रकला आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक सिलिंडरचे अनेक स्फोट झाले. ज्यानंतर आगीचा एकच भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. सिलिंडरच्या ब्लास्टमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सिलिंडर ब्लास्टनंतर ट्रकला आग लागल्याने हवेत धुराचे लोटही पसरले आहेत. तर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी आग काही वेळातच आटोक्यात आणली.
धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निसर्ग उद्यानच्या बाजूला गॅस सिलिंडरने भरलेले वाहन उभे होते. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान या गाडीला आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी आणि अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी आली. त्यानंतर ही आग नियंत्रणात आणली. यामध्ये साधारणपणे चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. Dharavi Fire |
मात्र या सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. Dharavi Fire |
हेही वाचा:





