हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स…! राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केले शिवणकाम ; धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही आढावा घेणार

Rahul gandhi visit in dharavi। लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आपल्या पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यातच एक भाग म्हणून राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी मुंबईतील धारावी झोपडपट्टीत भेट दिली. तसेच तिथल्या शिवणकामगारांशी मोकळेपणाने संवाद साधला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही आढावा घेणार Rahul gandhi visit in dharavi।
मुंबई दौऱ्यावर असणारे राहुल गांधी यांचे काँग्रेस नेत्यांनी व खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी धारावीमधील नवउद्योजकांशी चर्चा केल्यानंतर ते अदानी उद्योग समुहाकडून होणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही आढावा घेणार आहेत. त्यामुळे, राहुल गांधीचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.
राहुल गांधींनी धारावीमधील चामर स्टुडिओला भेट देत येथील उत्पादन, कलाकारी, बॅग्जची पाहणी केली. धारावीतील सुधीर राजभर भारतातील लाखो दलित तरुणांच्या जीवनाचा आणि प्रवासाचा आढावा घेतात. राजभोर यांनी धारावीच्या कारागिरांचे सुप्त कौशल्य ओळखून एक असा ब्रँड तयार केला जो जागतिक स्तरावर फॅशनच्या सर्वात प्रतिष्ठित कॉरिडॉरमध्ये ओळखला जातो.
मशीनवर केले शिवणकाम Rahul gandhi visit in dharavi।
पारंपारिक कारागिरी आणि आधुनिक उद्योजकतेचा संगम म्हणजे चामर स्टुडिओचे यश आहे. कुशल कारागिरांना त्यांच्या स्वतःच्या हातांनी बनवलेल्या वस्तूंची बड्या मार्केटमध्ये विक्री होत आहे. राहुल गांधींनी आज धारावीत सुधीर आणि त्यांच्या टीमसोबत गप्पा मारल्या, तसेच, त्यांचे काम जवळून पाहत स्वत:ही ते करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, राहुल गांधींनी शिवणकामही केले.राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या धारावी भेटीची फोटो शेअर केले असून या फोटोत राहुल गांधी हे मशिनवर शिवणकाम करत असल्याचे, बॅग्स विणत असल्याचेही दिसून येतात.
हेही वाचा
मनमोहन सिंग यांचे स्मारक कुठे होणार? सरकारने दिली ‘ही’ जागा, माजी पंतप्रधानांच्या कुटुंबाचीही संमती





