वर्षा गायकवाडांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची केली मागणी

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर व्होट जिहाद करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप नेते विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी “शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लढाई ही अदानीसाठी आहे. परंतु आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होट जिहाद केला जात आहे,” असे विधान केले होते.
यावर वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्याबाबत तक्रार केली आहे. “भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेत. अशा प्रकारे विधान करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आशिष शेलार यांच्या विधानाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी,” अशी विनंती गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत केली आहे.
वर्षा गायकवाड यांचे ट्वीट
तर वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत लिहिले की, “घ्या.. पुन्हा एकदा अदानींचे एजंट बरळले. अदानींच्या स्वार्थासाठी आता हे नालायक सरकारचे एजंट जनतेला चक्क अर्बन नक्षलवादी म्हणाले. हे बोलताना जरा लाज-शरम वाटायला हवी होती. सत्तेच्या मस्तीत इतपर्यंत यांची मजल गेली. मुंबईत उघड-उघड होणाऱ्या जमिनींच्या लूटवर हे पडदा टाकत आहेत. मी जे प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांची उत्तरंच यांनी दिली नाहीत. आणि आशिष शेलार धारावी संबंधित मुद्द्यांवर बोलण्यासाठी मला कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. धारावी माझा परिवार आहे. मी त्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात बोलणार, जो माझ्या परिवाराविरुद्ध कटकारस्थानं रचणार.”
घ्या.. पुन्हा एकदा अदानींचे एजंट बरळले. अदानींच्या स्वार्थासाठी आता हे नालायक सरकारचे एजंट जनतेला चक्क अर्बन नक्षलवादी म्हणाले. हे बोलताना जरा लाज-शरम वाटायला हवी होती. सत्तेच्या मस्तीत इतपर्यंत यांची मजल गेली. मुंबईत उघड-उघड होणाऱ्या जमिनींच्या लूटवर हे पडदा टाकत आहेत. मी जे… https://t.co/khnSpo7JzX
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 19, 2024
“तुमच्या लबाड सरकारचा एकच लक्ष्य आहे ‘गरीब हटाओ, धारावी मिटाओ, अदानी सिटी बनाओ।’ हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. तुम्हाला धारावी झोपडपट्टी दिसते पण, वास्तवात धारावी ही एक स्किल कॅपिटल आहे. इथल्या लोकांनी आणखी कुठे का जावं?तुम्ही मुंबई तुमच्या लाडक्या मित्राला विकत आहात आणि त्याचा भुर्दंड म्हणजे तुम्ही मुंबईकरांकडून त्यांच्या हक्काच्या जमिनी आणि उपजीविका हिसकावून घेत आहात, फक्त तुमच्या फायद्यासाठी,” असेही त्यांनी म्हंटले आहे.
&
The Chief Election Officer of Maharashtra had said that he shall be taking action against the use of words like Vote Jihad as the Model Code of Conduct is now in force. The Mumbai BJP chief @ShelarAshish while speaking about Dharavi redevelopment today, used the term Vote Jihad.… pic.twitter.com/DqLsrBwZNb
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 19, 2024
“शेलारजी, आता तुमच्या पक्षाच्या आणखी एका खोट्या कटकारस्थानावर बोलूया.. ते म्हणजे वोट जिहाद! हा फुटीरतावादी आणि बोगस शब्द वापरून तुम्ही समाजात तेढ निर्माण करून खऱ्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात. मी तुम्हाला पुन्हा सांगते की, या समोरासमोर आपण बोलू, माझ्या आणि धारावीकरांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं द्या, फेक नरेटिव्ह पसरवू नका,” असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा:
हरियाणात आखलेली ही रणनीती आता भाजपने झारखंडमध्येही आणली ; JMM म्हणाले,’आधी स्वतःच्या…’





