Pune : उरुळी देवाची परिसरातील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग
Updated On:

Pune | पुण्यातील हडपसरपासून भेकराईनगरजवळ असलेल्या उरुळी देवाची परिसरात असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसून, गोडाऊनचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
उरुळी देवाची परिसरात असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीची माहिती अग्नीशमल दलाला मिळताच अग्नीशमल दलाच्या चार गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, या भंगाराच्या गोडाऊनमध्ये अॅाक्सिजनच्या सिंलडरचा साठा होता. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या आगीत गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे.





