Latur News : लातूरच्या स्क्रॅप मार्केटमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे स्फोट होऊन ६ दुकाने जळून खाक
Latur News : लातूर शहरातील गजबजलेल्या भंगार बाजार (स्क्रॅप मार्केट) परिसरात सोमवारी (२८ सप्टेंबर) दुपारी भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली.

Latur News : लातूर शहरातील भंगाराची बाजारपेठ (स्क्रॅप मार्केट) परिसरात सोमवारी भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका वायरच्या दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. (Latur News)
आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की, काही वेळातच आसपासच्या ४ ते ६ दुकानांना आगीने आपल्या कवेत घेतले. लातूरच्या स्क्रॅप मार्केट परिसरातील एका वायरच्या दुकानात सोमवारी दुपारी अचानक आग लागली. (Latur News)
दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, जुन्या केबल्स, वायर आणि इतर ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्यामुळे आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. शॉर्टसर्किटमुळे मोठा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली व नागरिक भयभीत होऊन पळू लागले. (Latur News)
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (Latur News)
घटना घडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे वाढती आग आणि गर्दी अशा दुहेरी आव्हानाचा सामना अग्निशमन दलाला करावा लागला. आग इतर लगतच्या दुकानांमध्ये व रहिवाशी भागात पसरू नये, म्हणून पोलिसांनी परिसर सील करून खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत. (Latur News)
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ६ दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीचा अचूक पंचनामा केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Latur News)
Latur News : लातूर इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळ; जलसाठे मृत पातळीवर : आमदार निलंगेकर





