Pune News : नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी तरुणाचा प्रवेश; हातोडा, पक्कड जप्त
Pune News : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगर, मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी एका संशयित तरुणाने बेकायदा प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune News : विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगर, मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी एका तरुणाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी घडली. सुरक्षारक्षक आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (Pune News)
त्याच्याकडून हातोडा, पक्कड, हातमोजे आणि सुमारे दहा मीटर लांबीची दोरी जप्त करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास संबंधित तरुण गोऱ्हे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात शिरला. (Pune News)
सुरक्षारक्षक आणि तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता हातोडा, पक्कड, हातमोजे आणि दहा मीटर लांबीची दोरी आढळून आली. (Pune News)
निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर त्याने पाण्याच्या टाकीला जोडलेला नळ बंद करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण विद्यार्थी असल्याचे सांगितले. (Pune News)
मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्या ओळखीबाबतही तपास सुरू केला आहे. दरम्यान, संबंधित तरुण गोऱ्हे यांच्या निवासस्थानी नेमका कोणत्या उद्देशाने शिरला, त्याची खरी ओळख काय आहे, तसेच त्याच्याकडील साहित्याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता, याचा सखोल तपास करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे. (Pune News)
तरुणाला सोडविण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून दबाव आणला जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही पत्रकात करण्यात आला आहे. त्याचा चोरीचा हेतू होता की अन्य काही कारणासाठी तो निवासस्थानी शिरला, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. (Pune News)
लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी बेकायदा प्रवेश करणे आणि संशयास्पद साहित्य त्याच्याकडे आढळून येणे ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
शिवाजीनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Pune News)
Neelam Gorhe : कायदा सहाय्यामुळे भारतातील न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख – डॉ. नीलम गोऱ्हे





