Maryam Nawaz Sharif : पंजाबला शेजारच्या प्रांतांमधून जास्त धोका; मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी व्यक्त केले मत
पाकिस्तानातील पंजाब प्रांताला शेजारच्या देशापेक्षा शेजारच्या प्रांतांचा जास्त धोका आहे, असे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ (Maryam Nawaz Sharif) यांनी म्हटले आहे.

Maryam Nawaz Sharif : पाकिस्तानातील पंजाब प्रांताला शेजारच्या देशापेक्षा शेजारच्या प्रांतांचा जास्त धोका आहे, असे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ (Maryam Nawaz Sharif) यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये, विशेषतः खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. हे दोन्ही प्रांत पंजाब प्रांताला लागूनच आहेत. पंजाबची सीमा भारतातील पंजाब प्रांताला देखील लागून आहे.
पंजाब प्रांतात दहशतवादी कारवाया येत आहेत. मात्र दहशतवादी कारवायांचा हा धोका शेजारच्या देशातून कमी आणि शेजारच्या प्रांतातूनच जास्त प्रमाणात येतो आहे, असे मुख्यमंत्री मरियम नवाझ (Maryam Nawaz Sharif) यांनी लाहोरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानबद्दल त्या बोलत होत्या. हा धोका असूनही सुदैवाने पंजाब अजूनही सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील सत्तारुढ पीटीआयने मरियम नवाझ यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मरियम नवाझ यांचे उपहासात्मक वक्तव्य लाजिरवाणे असल्याचे संसदेचे सभापती आणि पीटीआयचे नेते असाद कैसर यांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वाच्या जनता पाकिस्तानच्या राष्ट्रीय सरकार आणि पूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या परिणामांना समोरे जावे लागते आहे, असे त्यांनी (Maryam Nawaz Sharif) म्हटले आहे.






