साताऱ्याचे जवान सुजित किर्दत यांना भावपूर्ण निरोप

Updated On:

सातारा : शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर आज चिंचणेर निंब येथे पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, कमांडर स्टेशन हेडक्वार्टर, कोल्हापूरचे कर्नल पराग गुप्ते यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

शहीद जवान सुजित किर्दत यांना मानवंदना देऊन कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते. ‘अमर रहे, अमर रहे सुजित किर्दत अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली.

सैन्य दल व पोलिस दलामार्फत पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. पिता नवनाथ, पत्नी सुवर्णा, मुलगा आर्यन, मुलगी इच्छा, भाऊ अजित यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. 

शहीद सुजित किर्दत यांचा मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, साताऱ्याचे गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्यासह लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

2026-10-05 18:12:55

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत