“लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण…” अभिनेत्री काजोलच्या विधानाने वेधलं सर्वांचे लक्ष

Actress Kajol | अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल यांचा ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हजेरी लावतात. आतापर्यंत या शोमध्ये आमिर खान, वरुण धवन, फराह खान आणि अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावलेली. अशातच आता विकी कौशल आणि क्रिती सेनन यांनी नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान, काजोलने लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
‘टू मच’ शोच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल आणि क्रिती सेनन पाहुणे म्हणून आले असताना, ‘लग्नाला एक्सपायरी डेट असावी का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर काजोलने सहमती दर्शवली आणि हिरव्या बॉक्समध्ये उभी राहिली.
यावर काजोल म्हणाली, ‘मला असं वाटतं कारण, कोणी असं सांगून थोडी ठेवलंय की, योग्य वेळी योग्य मुलाशी लग्न होईल? त्यामुळे दुसऱ्या लग्नाचा पर्याय असावा आणि जर एक्सपायरी डेट असेल तर जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही’ तर ट्विंकल म्हणाली की, ‘मला वाटत नाही असं असायला हवं, कारण हे लग्न आहे, वॉशिंग मशीन नाही.’ Actress Kajol |
View this post on Instagram
यावेळी काजोलने ट्विंकलला तिच्या मताशी सहमत होण्यासाठी मनवण्याचा प्रयत्नही केला, परंतु क्रिती आणि विकी यांनी ट्विंकलच्या बाजूने सहमती दर्शवून काजोलला विरोध केला. याचदरम्यान, पैशांनी आनंद विकत घेता येतो की नाही असं विचारलं असता यावर ट्विंकल आणि विकी कौशलने सहमती दर्शवली तर काजोल आणि क्रितीने असहमती दर्शवली.
काजोल म्हणाली की, ‘मला असं वाटत नाही. कितीही पैसे असले तरी त्याने आनंद विकत घेता येत नाही. मला असं अनेकदा वाटत की पैशांमुळे आनंद मिळवण्यामध्ये अडथळा येतो.’ काजोल आणि ट्विंकल खन्नाची ही बोल्ड आणि बिनधास्त विधानं सध्या चर्चेत आहे. Actress Kajol |
काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नाने आजकालची पिढी कपडे बदलतात तसे पार्टनर बदलते, हे चांगलं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ट्विंकलला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. Actress Kajol |
हेही वाचा :





