Kajol : सगळीकडे नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत २०२५ मधील आठवणींना उजाळा दिला जात जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार देखील नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करताना दिसत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री काजोल हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास व्हिडीओ शेअर करत तिचा २०२५ मधील हा खास क्षण असल्याचे म्हटले आहे. कजोलने शेअर केलेल्या व्हिडीओत तिची आई तनुजा देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजासोबत वेळ घालताना दिसत आहे. या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये काजोलने २०२५ संपत आहे आणि मी म्हणेन की हा माझ्या वर्षातील सर्वोत्तम क्षण होता. मी आणि माझी आई सेटवर एकत्र होतो. त्यानंतर आम्हाला कळले की वेडेपणा दुप्पट झाला आहे, असे तिने म्हटले आहे. View this post on Instagram A post shared by Kajol Devgan (@kajol) काजोल आणि तनुजा यांच्यातील आई-मुलीचे नाते हा क्षण पाहून किती खुललेले आहे हे दिसत आहे. चाहत्यांनी या गोड क्षणाचे कौतुक केले आहे. इतक्या वर्षांनी काजोल तिच्या आईसोबत स्क्रीन टाइम शेअर करणे हा एक खूप खास क्षण आहे. काजोल सध्या “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” या टॉक शोमध्ये दिसत आहे. ती ट्विंकल खन्नासोबत या शोचे सह-होस्टिंग करताना दिसत आहे. याव्यतिरिक्त काजोल शेवटची “ट्रायल सीझन २” या वेबसिरीजमध्ये दिसली होती. हेही वाचा : भाजपच्या महिला उमेदवाराला मोठा धक्का! निवडणुकीची संधीच हुकली; मुंबईतील ‘या’ वॅार्डमध्ये काय घडलं?