Janhvi Kapoor: करण जोहर जान्हवी कपूर बद्दल का आहेत इतके प्रोटेक्टिव्ह? टॉक शोमध्ये केला मोठा खुलासा

Janhvi Kapoor : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर नुकतेच ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. या शोमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान करण जोहर यांनी त्यांच्या वैयक्तिक भावना, बॉलिवूडमधील काही आठवणी आणि विशेषतः जान्हवी कपूरशी असलेल्या त्यांच्या जवळीकीबद्दल खुल्या मनाने संवाद साधला.
करण जोहर यांनी सांगितले की ते जान्हवीबद्दल इतके प्रोटेक्टिव्ह का आहेत…
“मी लहानपणापासूनच श्रीदेवी यांचा मोठा चाहता आहे. त्यांच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने मला नेहमीच प्रभावित केले. आज मला असं वाटतं की त्यांच्या निधनानंतर जणू त्यांनी त्यांच्या भावना माझ्याकडे सोपवल्या आहेत. त्यामुळे जान्हवीबद्दल माझ्या मनात आपोआप एक जबाबदारीची आणि जिव्हाळ्याची भावना निर्माण झाली आहे. मला वाटतं, मी तिला प्रत्येक अडचणीपासून वाचवावं.”
शोदरम्यान काजोल यांनी देखील श्रीदेवींबद्दलची एक सुंदर आठवण शेअर केली. त्यांनी सांगितले की,
“मी तेव्हा १९ वर्षांची होते आणि ‘बाजीगर’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्याच वेळी ऐकलं की श्रीदेवी जवळ आहेत. मी लगेच वडिलांना बोलावलं आणि त्यांना भेटायला गेले. मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही एकमेव अभिनेत्री आहात ज्या मला अप्रतिम वाटता. आपण कधी अभिनय शाळा सुरू केली, तर मी तुमची पहिली विद्यार्थिनी बनेन.’”
करण जोहर म्हणाले की ते आणि काजोल दोघेही श्रीदेवींचे मोठे चाहते होते. ते दोघे अजूनही त्यांच्या आठवणींबद्दल बोलतात आणि त्या संबंधित गोष्टी शेअर करतात. या चर्चेदरम्यान जान्हवी कपूरही थोडी भावूक झाली होती.
‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ हा टॉक शो सध्या प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. याचे नवे एपिसोड प्रत्येक गुरुवारी प्रदर्शित होतात.





