Crime News: मुलीचा धर्म लपवून लावले लग्न; बीडमध्ये चौघांवर गुन्हा

बीड – मुलीचा धर्म लपवून व तिचा यापूर्वी एक विवाह झालेला असल्याची माहिती लपवून एका एजंटाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने, 3 लाख रुपये घेवून पाटोदा तालुक्यातील एका तरुणाशी या मुलीचा विवाह लावून दिला.
मात्र, 15 दिवसानंतर बहिणीच्या घरी जाते म्हणून या नवविवाहितेने पोबारा केला. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पाटोदा तालुक्यातील एक 27 वर्षीय तरुण अल्पशिक्षीत असल्याने त्याचा विवाह होत नव्हता.
14 नोव्हेंबर रोजी अमोल हा मुलगी काजल सागर पाटील (रा. गांधीनगर,कोल्हापूर) हिला घेऊन आला. तिच्या सोबत बहिण सारिका चव्हाण (रा. सांगली) आणि पल्लवी (रा. गांधीनगर, कोल्हापूर) याही आल्या होत्या. त्याच दिवशी मुलगी पसंत पडल्याचे सांगून लग्नही पार पडले.
त्यानंतर पंधरा दिवसांनी सारिका चव्हाण हिने माझ्या घरीकार्यक्रम असल्याने बहिणीला पाठवा असे सांगितल्याने तिला सांगलीला पाठवले. मात्र 15 दिवस उलटूनही ती परत आली नाही. तिने फोनही घेतला नाही. सारिका हिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता.
काजलचे मुळ नाव करिष्मा हसन सय्यद असल्याचे सांगून तिने सागर पाटील या व्यक्तीशी काही वर्षांपूर्वी विवाह केला हाेता. आता ते सोबत रहात नाहीत असे सांगितले. फसवणूक झाल्याचे कळताच तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.





