Kareena Kapoor Post | अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टमध्ये तिने सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणावर काही लिहिले नाही. तर तिने लग्न आणि घटस्फोट यासारख्या विषयांवर भाष्य केले आहे. यात करीनाने जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी सांगितले आहे. मात्र तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुम्ही लग्न, घटस्फोट, चिंता, प्रसुती, आपल्या जवळच्याच निधन, पालकत्व या सगळ्या गोष्टींना कधी समजू शकणार नाही. जोपर्यंत तुमच्यासोबत हे सगळे घडत नाही, तो पर्यंत तुम्हाला कळणार नाही. तुम्ही विचार करत असाल की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक हुशार आहात. तर आयुष्यात तुमच्यासोबत असं काही होत नाही तोपर्यंत तुमच्यात नम्रता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात असे वाटते.” करीना कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे करीना कपूरनं लग्न आणि घटस्फोटाला टॅग केले आहे. त्यामुळे सैफ आणि तिच्यात काही झालेलं नाही ना? असा सवाल काहींना पडला आहे. दरम्यान, करीना कपूरचा पती सैफ अली खान यांच्यावर वांद्रेच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला होता. तेव्हापासून करीना आणि तिचे कुटुंब चर्चेत आले. सैफवर तब्बल सहा सर्जरी करण्यात आल्या. सैफवरील शस्त्रक्रियेनंतरही तो एकदम फिट दिसला. त्यामुळे देखील त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. अशात करीनानं केलेल्या या पोस्टनं सगळ्यांना धक्का बसला आहे. करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले तर, शेवटची ती हंसल मेहता यांच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ मध्ये पाहायला मिळाली. हेही वाचा: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाचे मोठे ऑपरेशन; चकमकीत 12 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहिद