Naxal Attack | छत्तीसगडच्या विजापूर आणि नारायणपूर येथील महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. रविवारी सकाळी झालेल्या या चकमकीत 12 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे.
तर सुरक्षा दलातील 4 जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या या भागात शोध ऑपरेशन सुरू आहे. चकमकीतून स्वयंचलित शस्त्रे देखील जप्त केली आहेत. डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी-60 चे सैनिक या भागात शोध ऑपरेशन करत आहेत.
दरम्यान, 1 फेब्रुवारी, 2025 रोजी बिजापूरमधील गंगालूर भागात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यात 8 नक्षलवादी ठार झाले होते. तर गेल्या महिन्यात छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या 16 नक्षलवादी ठार झाले.
छत्तीसगड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज्यात भाजपा सरकारच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 219 नक्षकांना ठार मारले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत राज्याला नक्षल मुक्त करण्याचे जाहीर केले आहे. मागील काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत कारवाई करत आहेत.
हेही वाचा:
भाजपची ‘शत-प्रतिशत’कडे वाटचाल! दिल्ली जिंकली, आता देशातील ‘या’ 21 राज्यांमध्ये BJP-NDA चे सरकार