AUS vs ENG : मार्नस लाबुशेन ठरला पिंक बॉलचा बादशहा! डे-नाईट टेस्टमध्ये ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू

Marnus Labuschagne 1st Batter to reach 1000 runs in Day-Night Tests : ॲशेस मालिका २०२५-२६ चा दुसरा डे-नाइट कसोटी सामना ब्रिसबेनमध्ये खेळला जात असताना, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो डे-नाइट कसोटी क्रिकेटमध्ये एक खास पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
लाबुशेनने रचला इतिहास –
मार्नस लाबुशेन डे-नाइट कसोटी सामन्यात १००० धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. ही अभूतपूर्व कामगिरी केवळ १६ डावांमध्ये साध्य केली. डे-नाइट कसोटीमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत चार शतके आणि चार अर्धशतके जमा आहेत. २०१९ पासून सहा वर्षांमध्ये त्याचा डे-नाइट कसोटीतील फलंदाजीची सरासरी ६६ हून अधिक राहिली आहे, जो त्याची या फॉरमॅटमधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी दर्शवतो.
लाबुशेनची दमदार अर्धशतकी खेळी –
Marnus Labuschagne becomes the FIRST ever player to score 1,000 Runs in Day/Night Test Matches 🙌#Ashes2025 #MarnusLabuschagne #AUSvsENG #ENGvAUS pic.twitter.com/204BPc3H1u
— Cric Updates (Bishwas🇳🇵) (@CricUpdate58494) December 5, 2025
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात मार्नस लाबुशेनने ६७ चेंडूंमध्ये आपले २५वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने एकूण ७८ चेंडूंचा सामना करत ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, ज्यात ९ चौकार आणि १ षटकार यांचा समावेश होता. १९६ च्या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला, जेव्हा लाबुशेन बाद झाला. सध्या ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा १३८ धावांनी मागे आहे.
इंग्लंडचा पहिला डाव ३३४ धावांवर संपुष्टात –
तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव ३३४ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने नाबाद १३८ धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रूटचे हे पहिले कसोटी शतक ठरले. इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली असली तरी, रूटने झुंजार फलंदाजी करत शेवटच्या विकेटपर्यंत किल्ला लढवला. त्याने जोफ्रा आर्चरसोबत ७० धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे फॅन आयोजकांसाठी ठरले डोकेदुखी! अचानक बदलावे लागले सामन्याचे ठिकाण
आर्चरने ३६ चेंडूंमध्ये ३८ धावांचे (२ चौकार, २ षटकार) योगदान दिले, जो त्याचा कारकिर्दीतील सर्वोच्च कसोटी स्कोर आहे.ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ७६.२ षटकांत इंग्लंडचा डाव गुंडाळला. रूटने २०६ चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकार लगावले. लाबुशेनने आर्चरचा अप्रतिम झेल टिपला. हा सामना अंतिम दिवसापर्यंत चुरशीचा राहण्याची शक्यता आहे.





