West Indies Cricket : ‘आयसीसी’ची मोठी कारवाई! वेस्ट इंडिजच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटरवर घातली 6 वर्षांची बंदी; जाणून घ्या….काय आहे कारण

Marlon Samuels banned from all forms of cricket for six years : आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग तसेच भ्रष्टाचार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सवर सहा वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सॅम्युअल्सवर हा नियमाचा भंग केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याचा तपास व चौकशीही करण्यात आली. त्यात तो दोषी आढळल्याने ही कारवाई करण्याच आल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे. अबुधाबी टी-10 लीग स्पर्धेत भ्रष्टाकार केल्याचे सिद्ध झाले आहे. या स्पर्धेत खेळताना त्याला काही महागडी भेटवस्तू तसेच अन्य काही गोष्टी मिळाल्या होत्या. त्या का मिळाल्या व कोणी दिल्या हे तो सांगू शकलेला नाही.
सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. निवृत्तीनंतर तो देशांतर्गत लीगमध्ये खेळत आहे. मात्र आता तो भ्रष्टाचारात दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. सॅम्युअल्स पुढील सहा वर्षे कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकणार नाही.
अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सॅम्युअल्स दोषी आढळला आहेत. आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शन यांनी गुरुवारी ही बंदीची घोषणा केली.
The former West Indies player with more than 300 international appearances has had his ban confirmed by the ICC.
Details 👇https://t.co/FCybKZNWxz
— ICC (@ICC) November 23, 2023
ते म्हणाले, सॅम्युअल्स जवळपास दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. या काळात त्यांनी अनेकवेळा भ्रष्टाचारविरोधी सत्रात भाग घेतला. भ्रष्टाचारविरोधी कोणती जबाबदारी आहे हे त्याला माहीत होते. तो क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण गुन्हा घडला तेव्हा त्यावेळ तो संघाचा भाग होता. ते पुढे म्हणाले की, सहा वर्षांची ही बंदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूसाठी सूचक इशारा म्हणून काम करेल.
2019 मध्ये अबू धाबी T-10 लीग दरम्यान सॅम्युअल्सने भ्रष्टाचाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर चार आरोप लावण्यात आले आहेत. यापूर्वी 2008 मध्ये त्याच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. तेव्हाही आयसीसीने सॅम्युअल्सला दोषी ठरवले होते. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2015 मध्ये आयसीसीला त्याची गोलंदाजी अॅक्शन चुकीची आढळली होती. यानंतर 1 वर्षं त्याच्यावर गोलंदाजी करण्यासाठी बंदी होती.
सॅम्युअल्सने 2016 मध्ये वेस्ट इंडिजसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. शेवटचा वनडे 2018 मध्ये खेळला गेला होता. त्याने 71 कसोटी सामन्यांमध्ये 3,917 धावा केल्या आहेत. या कालावधीत 41 विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्याने 207 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,606 धावा केल्या आहेत त्याबरोबरच 89 बळी घेतले आहेत. सॅम्युअल्सची वनडे सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 12 धावांत 3 बळी अशी होती.






