विशाखापट्टणम – यजमान भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (गुरुवार) येथे पहिल्या सामन्याने सुरुवात होत आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत झाल्यानंतर हो दोन संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे राहात आहेत. भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे नवोदितांसाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहिला टी-20 सामना)
वेळ – संध्याकाळी 7 पासून
ठीकाण – विशाखापट्टणम
थेट प्रक्षेपण – स्पोर्टस 18
नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, शुभमन गिल, महंमद शमी, महंमद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या प्रमुख खेळाडूंना वि8ांती देण्यात आली असून आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम गाजवलेल्या रिंकू सिंग, तिलक वर्मा,ऋतूराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही नामी संधी मिळाली आहे. तसेच ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळतानाचे दडपण कसे हाताळायचे याचाही अनुभव त्यांना मिळणार आहे.
– नियमित कर्णधारासह प्रमुख खेळाडूंना विश्रांती
– हार्दीक पंड्याची दुखापतीमुळे माघार
– सुर्यकुमार यादवकडे नेतृत्व
– महाराष्ट्राचा ऋतूराज उपकर्णधार
– रिंकू, तिलक वर्माला सुवर्णसंधी
– शमी, सिराजच्या जागी मुकेश व आवेशला संधी
प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा यांनाही निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळाली आहे. हार्दीक पंड्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याने विश्वकरंडक स्पर्धेतील सूर्यकुमार यादव याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्यासह इशान किशनही कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बाबत बोलायचे तर त्यांचे नेतृत्वही मॅथ्यु वेड करत आहे. त्यांचे कसोटी व एकदिवसीय कर्णधार आणि टी-20 सामन्यांसाठीचे कर्णधार वेगवेगळे आहेत. त्यांच्याही संघात नवोदित खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. विश्वकरंडकात खेळलेले स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल मार्कस स्टोनिस, अंतिम सामना गाजवलेला ट्रेव्हीस हेड, दोस इंग्लिस या मालिकेतही खेळणार आहेत. दोन्ही संघांतील खेळाडूंचा अनुभव पाहीला तर यजमान भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड राहील अशी शक्यता आहे.
🗣️ My message to the players is very clear – just be fearless and do whatever it takes to help the team 👌👌#TeamIndia Captain @surya_14kumar ahead of the 1st T20I against Australia.@IDFCFIRSTBank | #INDvAUS pic.twitter.com/jmjqqdcZBi
— BCCI (@BCCI) November 22, 2023
जयस्वाल यशस्वी ठरणार का..?
एकदिवसीय व कसोटी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेला यशस्वी जयस्वाल या टी-20 मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. ही मालिका पार पडल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याने निवड समितीवर प्रभाव पाडण्यासाठी तो यशस्वी होणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.