कौठळी गावात बंधाऱ्याचे भूमिपूजन
इंदापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून, इंदापूर तालुक्यात वेगाने विकासाची गंगा सुरू असून, या विकासात कौठळी गावातील अनेक वर्षापासून उपेक्षित असणाऱ्या, दोन बंधाऱ्याची कामे पूर्ण होणार असल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध होणार आहे. अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील कौठळी गावात रविवार (दि. 23) दोन बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे व पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वरकुटे खुर्द गावचे पोलीस पाटील संदेश देवकर,
राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडिया इंदापूर तालुका अध्यक्ष हामा पाटील, व पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत मारकड, कौठळी ग्रामपंचायत सरपंच नामदेव पाटील, हिरामण मारकड, सुनील खामगळ, सोसायटी चेअरमन आबा मारकड, सुभाष पिसाळ, कालिदास पाटोळे, मोहन पवार, भारत मारकड, भिवा मारकड, आदिक माने, दत्तात्रय माने, कासम शेख, गोरख पाटोळे, तुकाराम मारकड, नामदेव राऊत, नंदकुमार चितारे, साहेबराव मारकड, किरण मारकड, राजू खामगळ, संतोष खामगळ, नितीन मारकड, शरद मारकड, राहुल मारकड, देविदास पिसाळ यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या हाकेला धावणारे मामा
कौठाळी गावात विकास गंगा आमदार दत्तात्रय भरणे यांनी आणली मात्र या परिसराला मागील दहा वर्षांपूर्वी विकास माहिती नव्हता. लोकांना सुविधा मिळत नव्हत्या, गावागावात – वाडी वस्तीवर, विकास व नागरिकांना सुविधा पुरविण्यात तसेच सामान्य जनतेच्या हाकेला धाव घेणारे फक्त भरणेमामा आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील यांनी काढले.