मोहनलाल सोबत दिसणार मराठमोळी अप्सरा ! ‘या’ साऊथ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करताच दिली महत्वाची अपडेट

मुंबई – सोनाली कुलकर्णी मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘मलाईकोट्टई वलिबान’ या चित्रपटात सुपरस्टार मोहनलालसोबत सोनाली दिसणार आहे. दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरीचा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. याबाबतची अपडेट सोनालीने आपल्या सोशल मीडियावरून दिली.
या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचीही महत्त्वाची भूमिका आहे. नुकतंच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती शेअर केली. सोनालीने चित्रपटाच्या टीमसोबतचा एक ग्रुप फोटो देखील यावेळी पोस्ट केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘जानेवारी ते जून हा अद्भुत प्रवास संपला आहे.
या चित्रपटाचा एक भाग असल्याबद्दल सोनालीने तिच्या पोस्टद्वारे लिजो जोस पेलिसरीचे आभार मानले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 130 दिवस चालले होते. याचे शूटिंग राजस्थान, चेन्नई आणि पुद्दुचेरीसह अनेक ठिकाणी पार पडले. या चित्रपटाद्वारे मोहनलाल पहिल्यांदाच लिजोसोबत काम करत आहेत.

‘मलाईकोट्टाई वालीबान’ या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती. जॉन अँड मेरी बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. मोहनलालबद्दल बोलायचे झाले तर, 62 वर्षीय अभिनेत्याचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. ‘मलाईकोट्टाई वालीबान’ व्यतिरिक्त तो जीतू जोसेफच्या ‘राम’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे.



