अभिनेता मोहनलाल यांची अचानक तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Malyalam Actor Mohanlal | मल्याळम अभिनेता मोहनलाल यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहनलाल यांना कोची येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अभिनेत्याला ताप आणि श्वास घेताना त्रास होत होता. ज्यानंतर त्यांना मायल्जियाचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहनलाल यांना रुग्णालयाकडून 5 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर मोहनलाल यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीविषयी रुग्णालयाकडून एक स्टेटमेंटही जारी करण्यात आले. Malyalam Actor Mohanlal|
नुकतेच ते आगामी चित्रपटाच्या शूटींगनंतर गुजरातहून परतले होते. तसेच दिग्दर्शक पदार्पणाच्या ‘बॅरोज’ चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे कामही पूर्ण केले आहे. दिग्दर्शक म्हणून मोहनलाल यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक होते, परंतु मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अभिनेत्याची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून सगळे प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, मोहनलाल 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या लुसिफरच्या सिक्वेलची तयारी करत आहे. ज्याचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन करत आहेत. हा चित्रपट मार्च 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मोहनलाल यांचा ‘बॅरोज’ चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात गुरु सोमसुंदरम आणि कोमल शर्मा यांच्याही भूमिका आहेत. Malyalam Actor Mohanlal |
हेही वाचा :
“आजचे मरण उद्यावर ढकलले आणि हे ‘एक देश एक निवडणूक’ घ्यायला निघालेत”; ठाकरे गटाची टीका





