Actor Mohanlal : दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना मातृशोक; आई शांताकुमारी यांचे ९० व्या वर्षी निधन !

Actor Mohanlal : मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांच्या मातोश्री शांताकुमारी यांचे आज मंगळवारी (३० डिसेंबर) दुपारी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. कोची येथील एलमक्कारास्थित मोहनलाल यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
शांताकुमारी या गेल्या काही काळापासून वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा (स्ट्रोक) झटका आला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. शेवटच्या काळात त्यांना बोलतानाही प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या पश्चात मुलगा मोहनलाल आणि त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. त्यांचे पती विश्वनाथन नायर आणि मोठा मुलगा प्यारेलाल यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
അമ്മയ്ക്ക് പ്രണാമം 🌹
മോഹന്ലാലിന്റെ അമ്മ ശാന്തകുമാരി അമ്മ അന്തരിച്ചു | Mohanlal | Santhakumariamma#Mohanlal #SanthakumariAmma @Mohanlal pic.twitter.com/IYe5roYPat
— AKMFCWA Official (@AkmfcwaState) December 30, 2025
मोहनलाल यांचे प्रेरणास्थान.!
मोहनलाल आपल्या आईच्या अत्यंत जवळ होते. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आईला दिले आहे. “आई हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे,” असे ते नेहमी अभिमानाने सांगत. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून ते स्वतः आईची काळजी घेत असत. आईच्या जाण्याने मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिनेसृष्टीतून वाहिली श्रद्धांजली
शांताकुमारी यांच्या निधनाची बातमी समजताच दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह देशभरातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. मल्याळम सुपरस्टार ममूटी यांनी मोहनलाल यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शांताकुमारी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, शांताकुमारी यांच्या पार्थिवावर उद्या, ३१ डिसेंबर रोजी कोची येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





