Prajakata Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पोहचली कुंभमेळ्यात; संगमात घेतली डुबकी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली….

Updated On:
Prajakata Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पोहचली कुंभमेळ्यात; संगमात घेतली डुबकी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली….

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात लाखो भाविक दाखल होत आहेत. येथे गंगा, यमुना आमि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने यास विशेष धार्मिक पौराणिक महत्व आहे. या संगमात स्नान केल्यानंतर मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. आतापर्यंत या नद्यांच्या संगमात लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. अनेक सिलेब्रिटींनी देखील संगमात डुबकी घेत पवित्र स्नान केल्याचे पाहिला मिळत आहे. अशातच मराठी इंडस्ट्रीतील प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहचली असून तिने संगमात डुबकी घेत पवित्र स्नान केले. याचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओत कुंभमेळ्यातील साधूसंतांची तिने भेट घेतली. देवदेवतांची पूजा केली आणि त्यानंतर संगमामध्ये पवित्र स्नान केले. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव, असे लिहित तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तीर्थराज – प्रयागराज #महाकुंभ #२०२५. लहानपणापासूनच कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. 144 वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोहोचले. (काल सुखरूप महाराष्ट्रातही पोहोचले.) आयुष्यात एकदाच येणारा अनुभव, अशी पोस्ट प्राजक्ताने लिहिली आहे.

महाकुंभमेळ्याचे वैशिट्ये अलौकिक

तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्ये अनेक अर्थांनी अलौकिक आहे. महाकुंभमेळ्यामध्ये  निरनिराळ्या पंथांचे 13 आखाडे सहभागी झाले आहेत. १५ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली असून ४५ दिवस हा महाकुंभमेळा चालणार आहे. आतापर्यंत लाखो भाविक महाकुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोटीतून महाकुंभमेळ्यासाठी केलेले नियोजनाची पाहिली केली. उत्तरप्रदेशेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियोजनाबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर मोदींनी संगमात पवित्र स्नान केले.

आणखी संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट; अर्धा तास चर्चा, मुंबईत काय घडलं?

2026-09-13 12:49:28

Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट; अर्धा तास चर्चा, मुंबईत काय घडलं?

Ganesh Naik :‘बाहेर काढलेली भुतं परत बंद करण्याची ताकद असेल...'; गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

2026-09-13 08:01:19

Ganesh Naik :‘बाहेर काढलेली भुतं परत बंद करण्याची ताकद असेल...'; गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई

2026-09-12 16:43:28

Pune Lok Adalat : कर्ता गमावलेल्या कुटुंबाला वर्षभरात न्याय; 1.10 कोटींची नुकसानभरपाई

Sanjay Raut : एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय : संजय राऊत बरसले! सगळचं काढलं...

2026-09-12 11:18:16

Sanjay Raut : एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय : संजय राऊत बरसले! सगळचं काढलं...

Dr. Ratnakar Mahajan passes away : पुरोगामी विचारांचा लढवय्या नेता हरपला; काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन

2026-09-12 08:17:41

Dr. Ratnakar Mahajan passes away : पुरोगामी विचारांचा लढवय्या नेता हरपला; काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन