मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ‘आसावरी जोशी’ ओळखल्या जातात. मात्र, अभिनय क्षेत्रात कामगिरी बजविल्यानंतर ‘आसावरी जोशी’ यांनी राजकारणात प्रेवेश केला आहे. आज (दि. ७) मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘आसावरी जोशी’ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश केला आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अन्य नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अभिनेत्री आसावरी जोशी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आल्या आहेत. सध्या त्या ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यापूर्वी देखील अनेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी आसावरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची निवड केली आहे. आसावरी यांनी 1986 मध्ये ‘माझं घर माझा संसार’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं.