Devendra Fadnavis : मराठा आरक्षण प्रश्नी चर्चेस सरकार तयार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीरदृष्ट्या शक्य असलेल्या, घटनात्मकदृष्ट्या वैध आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन न करणाऱ्या मागण्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. (Devendra Fadnavis)
तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadnavis)
नागपुर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी असून ते आंदोलकांशी चर्चा करीत आहेत. या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच अत्यंत संवेदनशीलतेने काम करीत आहेत. (Devendra Fadnavis)
त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. ज्या मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या नसतील, अशा सर्व मागण्यांसाठी चर्चेची दारे खुली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis : सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा आत्मा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले मत




