Devendra Fadnavis : सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा आत्मा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले मत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्माच्या सर्वसमावेशक स्वरूपावर भर दिल्यानंतर, सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा आत्मा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी म्हटले.

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्माच्या सर्वसमावेशक स्वरूपावर भर दिल्यानंतर, सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा आत्मा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी म्हटले. मात्र, सहिष्णुता म्हणजे आक्रमणांना प्रत्युत्तर देऊ नये असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यूयॉर्कमधील वन वर्ल्ड: वन ह्युमॅनिटी फेथ लीडर्स समिटला (एक जग: एक मानवता – धर्मगुरूंची परिषद) संबोधित करताना भागवत म्हणाले होते की, जर एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदूच राहत नाही.
यावर प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भागवत हे जे काही बोलतात, त्यावर आम्ही कधीच भाष्य करत नाही. तरीही, भागवतांनी मांडलेले ते तत्त्व अगदी योग्य होते.
कारण हिंदुत्वाचा आत्मा काय आहे? तर ती सहिष्णुता आहे. ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि याचे कारण म्हणजे आपण आपली मूल्ये इतकी भक्कम ठेवली की, जगभरातून झालेली आक्रमणेही आपण सहिष्णुतेने सहन केली. हिंदू धर्माने आक्रमकांना आपल्या प्रवाहात सामावून घेतले आणि ज्यांना बाहेरच्या जगाने नाकारले होते, मग ते ज्यू असोत किंवा इराणमधून आलेले आपले बांधव असोत, त्यांनाही आपल्या संस्कृतीत स्थान दिले.
म्हणूनच मी नेहमी म्हणतो की, हिंदूंना धार्मिक सहिष्णुतेचे धडे देण्याची गरज नाही. सहिष्णुता हिंदूंच्या रक्तातच भिनलेली आहे. हिंदुत्वाचा एक महत्त्वाचा अर्थ सहिष्णुता हाच आहे, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.






