Maratha Reservation : “सरकारनं आजचं मरण उद्यावर ढकललं….’; अध्यादेशावर एकनाथ खडसे असं का? म्हणाले…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा बांधवांसह मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारकडे आपल्या 13 मागण्या करतानाच निर्णायक इशारा दिला होता. मात्र, वाशीमधील गर्दी पाहून सरकारने एक पाऊल मागे घेत अखेर जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या महत्वाच्या निर्णयावर राज्यातील अनेक मोठे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पण अश्यातच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारच्या या अध्यादेशावर संशय घेतला आहे. सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर किती टिकेल याची शंका आहे. सरकारने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते.
आजचं मरण उद्यावर ढकललं….
माध्यमांशी बोलतां एकनाथ खडसे म्हणाले की, “सरकारने आजच मरण उद्यावर ढकलावं या दृष्टीने हा अध्यादेश काढलेला दिसतोय. सरकार या अध्यादेशाद्वारे मराठा समाजाची दिशाभूल करतंय का काय? असं होता कामा नये. कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकला पाहिजे. पण हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याबाबत मला शंका आहे. कारण सगेसोयरे रक्ताच्या नात्यात येत नाही.
त्यामुळे सरकार अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल करतंय की काय असं वाटतं. तसं होऊ नये, मराठा समाजाचा प्रचंड दबाव होता आणि या दबावामुळे सरकार झुकलं. त्यादृष्टीने सरकारने हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवलं असं म्हणता येईल. मात्र उद्या जर फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही. असं एकनाथ खडसे म्हणाले.
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी सग्यासोयऱ्यांसाठी केलेली मागणी मान्य ; ‘सगेसोयरे’ नेमके कोण? ; वाचा सरकारच्या जीआरमधील शब्दन् शब्द ..
https://www.dainikprabhat.com/maratha-reservation-manoj-jarangs-demand-for-sagyasoyra-accepted-who-exactly-is-sagesoyre-read-govts-gr-word-by-word/





