Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल

मुंबई – मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. पाच पानांचे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जीआर रद्द करु नये असं या कॅव्हेटमध्ये म्हटलं आहे. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटला होणारा विरोध लक्षात घेता काळकुटे यांच्या माध्यमातून हे कॅव्हेट दाखल केले आहे.
ओबीसी समाज न्यायालयात या गॅझेटला आव्हान देण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयाकडून या जीआरला स्थगिती देण्याची परिस्थिती निर्माण झाली तर मात्र मराठा समाजाला म्हणणं मांडता येईल. त्यानंतर कोणताही कायदेशीर निर्णय हा घेतला जाऊ शकतो.
काही लोक न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं काळकुटे यांच्या माध्यमातून कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुनच हे कॅव्हेट दाखल झाल्याची माहिती गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.





