Maratha Reservation । ‘मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा…’; कोणी केली मागणी? पाहा….

Maratha Reservation । Sharad Pawar । Manoj jarange | मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली असून त्यावर ते ठाम आहेत.
या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. ८ जून पासून सुरू झालेल्या उपोषणाचा त्यांचा आज चौथा दिवस आहे. यादरम्यान आता त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.
गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आहे. मात्र त्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाला देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
“डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले आहे. परंतु मी उपचार घेणार नाही. माझी भूमिका कायम आहे,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा…
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. परंतु शासनाकडून दखल घेतली गेली नाही. यामुळे नाशिकमध्ये शरद पवार यांना साकडे घालण्यात आले. मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात शरद पवार यांना लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजकीय नेत्यांना दिले हे इशारे –
– सर्व आमदार खासदारांनी एकत्रित अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे त्यांना हमी द्यावी.
– जर हे नेते आंतरवाली सराटी येथे गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरापासून सर्वप्रमुख राजकीय नेत्यांच्या घरासमोर केले जाईल.
– आमदार खासदारांना जर सुरक्षित मतदारसंघात फिरायचं असेल तर आंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे.





