#व्हिडीओ; बाजारात आणखी बरेच आमदार – राणे
Updated On:

मुंबई: दोन आमदार परत राष्ट्रवादीत गेले म्हणून भाजपला काही फरक पडत नाही. बाजारात आणखी बरेच आमदार शिल्लक आहेत. आस मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केल आहे. एका मराठी वुत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
शनिवारी सकाळी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे यावर राणे म्हणाले की सर्वाना जरी हा भूकंप वाटत असला, तरी मला तो भूकंप वाटत नाही. कारण मी पूर्वीच सांगितलं होत कि राज्यात भाजपचेच सत्ता येणार आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले कि, राष्ट्रवादीचे आमदार सांगत आहेत की आम्हाला फसवून राजभवनावर नेण्यात आलं. फसवून न्यायला ते काय लहान आहेत का असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही राणेंनी केला आहे.





