चमकदार साडीत दिलासा ‘Manushi Chhillar’चा ग्लॅमर्स अंदाज; नयनरम्य व्हिडिओ व्हायरल !

Manushi Chhillar : ‘मानुषी चिल्लर’ ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि ‘मिस वर्ल्ड 2017’ स्पर्धेची विजेती आहे. तिने फेमिना मिस इंडिया 2017 स्पर्धेत हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये ती जिंकली होती. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी मानुषी ही भारतातील सहावी प्रतिनिधी आहे.
‘पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. पहिल्याच सिनेमात तिने बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली. या सिनेमातील तिच्या अदाकारीचे कौतुकदेखील झाले होते.
View this post on Instagram
‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकल्यानंतर मानुषीने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून अभिनयाचे धडे गिरवले. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊनही तिने मिस वर्ल्ड झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करणे निवडले.
View this post on Instagram
मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमर्स लूकमुळे कायम चर्चेत असते. याचीच पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. नुकतंच पांढऱ्या रंगाच्या जड साडीत ही अभिनेत्री एखाद्या राणी सारखीच दिसत होती.
याआधीही मानुषीचा पांढऱ्या रंगाचा साडीचा लूक लोकांना खूप आवडला होता. आणि आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा असाच गोंडस अंदाज फॅन्सला पाहायला मिळाला आहे. अभिनेत्रीचा हा साडी लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.





